संबंधित माहिती
- भाऊबीज आणि यमराजाचा काय संबंध, जाणून घ्या कशी झाली यम द्वितीयेची सुरुवात
- भाऊबीजच्या दिवशी या गोष्टींकडे बहिण भावांनी ठेवावे विशेष लक्ष, या चुका करू नका
- Bhau Beej Katha भाऊबीज कथा मराठी
- Dhanteras 2024 Muhurat धनत्रयोदशी पूजन शुभ मुहूर्त आणि विधी
- Bhau Beej 2023 भाऊबीज या दिवसापासून चित्रगुप्त आपल्या जीवनाचा हिशेब लिहितात
भाऊबीज कविता
कळकळ अंतरीची वसते परस्पर ह्रदया,
आज ओवाळींन मी तुजला भाऊराया,
कित्ती भांडणे केली, खोड्या केल्यात कित्तीतरी,
पदार्थ तुझ्या आवडीचा खाता, आठवण येतेच मनांतरी,
नकळत निघते मुखातून, काय काय आवडते तुजला,
नसलास जरी तू तिथे, आवड तुझी ठाऊक रे मजला,
एकच वस्तू लहानपणी वाटून होती घेतली,
आठ्व आज ती येता, पापणी होते ओली,
प्रत्येक भावास एक बहीण असावी,
बहिणीसही हक्काने जावयास एक जागा असावी,
निघतात मग विषय, किस्से बालपणी चे,
तेवढेच हलके होते रे , ओझे मनावरचे!!
..अश्विनी थत्ते.
