Devuthani Ekadashi 2022 प्रबोधिनी एकादशीला या गोष्टी करणे टाळा
सनातन धर्मात एकादशीच्या व्रताचे खूप महत्त्व आहे. यामध्ये देवोत्थान आणि देव प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देव उठनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीहरी चातुर्मासाच्या दीर्घ झोपेनंतर जागे होतात. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवसापासून 4 महिन्यांच्या प्रदीर्घ अंतरानंतर शुभ मंगळ कार्येही सुरू होतात. या दिवशी व्रत केल्यास बैकुंठधामची प्राप्ती होते. हे व्रत न पाळणाऱ्यांनीही या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दीपदान
या दिवशी नदी तीर्थ क्षेत्रातील घाटावर जाऊन दीपदान करतात. ही दिवाळी देवता साजरी करतात असे मानले गेले आहे. देव दिवाळीला सर्व देवतागण गंगा नदीच्या घाटावर येऊन दीप प्रजवल्लित करुन आनंद उत्सव साजरा करतात. म्हणूनच या दिवशी गंगा स्नान करुन दीपदान करण्याचं महत्व आहे. या दिवशी दीपदान केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं.
तुलशी पूजन
या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा केली जाते. अनेक राज्यांमध्ये या दिवशी तुळशी विवाह आयोजन केलं जातं. या दिवशी तुळस तोडू नये. या दिवशी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा. द्वादशी तिथीला तुळशीच्या पानांनी पारणं करावं. व्रत करणार्यांनी तुळस तोडू नये. आवश्यक असल्यास मुलांकडून किंवा वयस्कर ज्यांनी व्रत ठेवला नसेल त्यांच्याकडून तुळस तोडवावी.
अशा लोकांना नरकात स्थान मिळतं
एकादशी विष्णूंना प्रिय तिथी आहे. पुराणांप्रमाणे या दिवशी व्रत करत नसणार्यांनी देखील कांदा-लसूण, मांस, अंडी किंवा तामसिक पदार्थांचे सेवन करु नये. या दिवशी भात खाऊ नये. शारीरिक संबंध ठेवू नये.
तांदळाचे सेवन करु नये
शास्त्रांप्रमाणे एकादशी तिथीला तांदूळ किंवा तांदळाने तयार पदार्थ खाऊ नये. या दिवशी तांदूळ खाल्लयाने सरपटणारे प्राणी अशा योनित जन्म मिळतो असे मानले गेले आहे.
हे केल्याने लक्ष्मी रुसून बसेल
या दिवशी मोठ्यांचा अपमान करु नये. घरात शांति राखावी. वातावरण शुद्ध आणि आनंदी नसेल तर लक्ष्मी प्रसन्न होत नसते.
सत्यनारायण कथा
या दिवशी सत्यनारायण देवाची कथा श्रवण करावी.
हे करणे टाळा
या दिवशी दिवसाला झोपणे टाळावे. आजारी किंवा शारीरिक रुपाने कमजोर असल्यास या दिवशी आराम करताना उशाशी तुळशीचं पान ठेवां. या दिवशी मदिराचे सेवन करु नये. क्रोध, खोटे बोलणे, इतरांना चिडवणे टाळा.