1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

प्रगतीसाठी धनत्रयोदशीपासून करा हा सोपा उपाय

Dhantrayodashi
यश आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आपण प्रयत्नरत असाल तर आपल्यासाठी एक सोपा उपाय आहे. धनत्रयोदशीला हा उपाय अमलात आणून आपण प्रगती करू शकता.
 
सामुग्री: दक्षिणावर्ती शंख, केशर, गंगाजल पात्र, धूप उदबत्ती, दिवा, लाल वस्त्र.
 
विधी: सर्वात आधी आपल्यासमोर धन्वंतरी व देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यापुढे लाल वस्त्र पसरवा. त्यावर दक्षिणावर्ती शंख ठेवा. त्यावर केशराने स्वस्तिक मांडा आणि कुंकू वाहा. नंतर स्फटिक माळाने खालील दिलेल्या मंत्राच्या 7 माळ जपा. 
 
मंत्रः :
ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः।
 
तीन दिवस हे केल्याने मंत्र-साधना सिद्ध होते. मंत्रजप पूर्ण झाल्यावर लाल वस्त्रात शंख बांधून घरात ठेवा. घरात हा शंख ठेवल्याने प्रगती होणे निश्चित आहे.