सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (17:43 IST)

Diwali 2024: 31 ऑक्टोबर की 01 नोव्हेंबर, दिवाळी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि अचूक माहिती जाणून घ्या

diwali
Diwali 2024 Date: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याबद्दल साजरा केला जातो. पण यावेळी बहुतांश लोकांच्या मनात संभ्रम आहे की यावेळी दिवाळी कधी? दिवाळी कधी साजरी होणार, 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर? दिवाळी कधी आहे ते येथे जाणून घ्या
 
हिंदू धर्मात आश्विन मास अमावस्येच्या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा दिवाळी हा सण 1 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाईल. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि 1 नोव्हेंबर 2024 रोजी महालक्ष्मी पूजन होईल.
 
अमावस्या तिथी प्रारम्भ- 31 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 03:52 वाजेपासून
अमावस्या तिथी समाप्त- 01 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 06:16 वाजता
 
पंचांगानुसार लक्ष्मी पूजनाची सर्वात शुभ वेळ संध्याकाळी 5.36 ते संध्याकाळी 06:16 दरम्यान आहेत.

दिवस दिवाळी 2024  तारीख
दिवस पहिला धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
दिवस दुसरा नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर 2024 (गुरुवार)
दिवस तिसरा लक्ष्मी पूजन 1 नोव्हेंबर 2024 (शुक्रवार)
दिवस चौथा दीपावली पाडवा 2 नोव्हेंबर 2024 (शनिवार)
दिवस पाचवा भाऊबीज 3 नोव्हेंबर 2024 (रविवार)
प्रदोष काल: संध्याकाळी 5.36 ते रात्री 08.11
वृषभ काल : संध्याकाळी 06.20 ते रात्री 8.15 पर्यंत
 
काहींच्या मते अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर 2024 रोजी असून या दिवशी लक्ष्मी पूजन करावे असे मत आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन करु इच्छित असणार्‍यांसाठी शुभ मुहूर्त या प्रकारे आहे-
अमृत काल : संध्याकाळी 05:32 ते 07:20 पर्यंत
 
2024 लक्ष्मी पूजन विधी
दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यानंतर लक्ष्मीची मूर्ती लाकडी चौरंगावर लाल किंवा पिवळा कापड पसरवून ठेवावी‍.
मूर्तीला स्नान घालून स्वच्छ करावे.
धूप आणि दिवे लावावे. देवांसाठी लावलेला दिवा कधीच विझू नये.
त्यानंतर देवीच्या कपाळावर हळद, चंदन आणि अक्षदा लावाव्या. 
त्यानंतर हार आणि फुले अर्पण करावीत.
पूजेच्या वेळी अनामिकेवर सुगंध (चंदन, कुमकुम, अबीर, गुलाल, हळद, मेंदी) लावावी.
पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करावा. लक्षात ठेवा नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरत नाही.
प्रत्येक ताटावर तुळशीचे पान ठेवले जाते.
शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून पूजेची सांगता होते.
जेव्हा घरामध्ये किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा प्रमुख देवतेसोबत स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश मातृका, सप्त मातृका यांचीही पूजा केली जाते. परंतु केवळ पंडितच तपशीलवार पूजा करतात, म्हणून तुम्ही पंडिताच्या मदतीने ऑनलाइन देखील विशेष पूजा करू शकता. विशेष पूजा पंडिताच्या साहाय्यानेच करावी, जेणेकरून पूजा व्यवस्थित होईल.