बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

धनतेरसच्या दिवशी या वस्तू मुळीच खरेदी करु नये

Dhanteras 2023: दिवाळीत धनतेरस या दिवशी खूप खरेदी केली जाते. धनत्रयोदशीचा मुहूर्त खरेदी करण्यासाठी शुभ असल्याचे मानले जाते. जर आपणही या दिवशी खरेदी करत असाल तर काय वस्तू खरेदी करणे टाळावे हे देखील माहित असणे गरजेचे आहे. कारण चुकुन आपण या दिवशी एखादी नकारात्मक वस्तू खरेदी केली तर नुकसान झेलावं लागू शकतं.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करुन नये | Things you should NOT buy on Dhanteras
लोखंड : लोखंड शनीची धातू आहे आणि या दिवशी घरात लोखंड आणल्याने दारिद्रय येऊ शकतं.
एल्युमिनियम : एल्युमिनियम राहूची धातू आहे आणि घरात या दिवशी आणल्याने दारिद्रय येऊ शकतं.
स्टील : स्टील देखील लोखंडच असतं. म्हणून हे खरेदी करु नये.
प्लास्टिक : प्लास्टिक खरेदी केल्याने भरभराटीवर वाईट परिणाम होतो.
काच : काच किंवा काचेची भांडी देखील राहूची धातू असल्याने यामुळे घरात राहूचा प्रवेश होतो.
काळ्या रंगाचे कपडे : या दिवशी काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
तेल किंवा तूप : या दिवशी तेल किंवा तूप खरेदी करु नये.
चीनी मातीची भांडी : या दिवशी चीनी मातीची भांडी खरेदी करु नये याने घरातील लक्ष्मी नाहीशी होते.
 
यंदा 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी धनत्रयोदशी सण साजरा केला जाईल.
 
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त- संध्याकाळी 06:20 ते रात्री 08:20 पर्यंत
प्रदोष काल मुहूर्त- संध्याकाळी 06:02 ते रा‍त्री 08:34 पर्यंत
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:00 ते 12:45 पर्यंत
विजय मुहूर्त- दुपारी 02:15 ते 03:01 पर्यंत