रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By
Last Updated : बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (11:05 IST)

Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी

tulsi vivah
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
 
तुळसी विवाह का महत्व
देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधीनुसार केला जातो. असे मानले जाते की या दिवशी माता तुलसी आणि भगवान शालिग्रामची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. सर्व शुभ कार्याची सुरुवात देखील या दिवसापासून होते.
 
भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
 
पूजा विधी
पूजेच्या वेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवावं. त्यापुढे रांगोळी काढावी.
दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवावी. 
या दिवशी तुळशीला मध आणि लाल ओढणी अर्पित करावी.
तुळशीची आपल्या परंपरेनुसार साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरावी.
तुळशी वृंदावनात शालीग्राम ठेवून तीळ अर्पण करावे.
एकादशीच्या दिवशी तुळशी आणि शालिग्राम दुधात भिजवलेल्या हळदीचे टिळक करावे.
पूजेनंतर 11 वेळा तुळशीची प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालताना हातात अक्षता ठेवाव्या. रिकाम्या हाताने प्रदक्षिणा घालू नका.
मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावावा. 
यानंतर नैवेद्य अर्पण करावं आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना वितरित करावं.
पूजा झाल्यावर भगवान विष्णूंना जागे होण्याचे आवाहन करा.
थाळी वाजवून देखील भगवान विष्णूला जागे होण्याचे आवाहन करता येतं.