शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (14:21 IST)

योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बिर्याणीवरून केलेले वक्तव्य भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. योगींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून योगींना नोटीस बजावून त्यावर खुलासा मागितला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान दोन दिवसांवर आलेले असताना भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता शक्यता आहे.
 
त्यावेळी बोलताना योगींनी शाहीन बागेतील निदर्शकांना केजरीवाल‍ बिर्याणी खाऊ घालत असल्याचे म्हटले. दिल्लीतील शाहीन बाग हा परिसर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनांचे केंद्रस्थान बनला आहे. त्याच्या संदर्भ देत योगी यांनी केजरीवाल यांना टीकेचे लक्ष्य केले. भाजपने प्रचारावेळी शाहीन बाग मुद्यावर प्रामुख्याने भर दिला.