रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (16:28 IST)

या दिवाळीला सीताफळ पासून बनवा लाडू

Custard Apple
साहित्य- 
1 कप सीताफळाचा गर 
1 कप नारळाचा किस 
1/2 कप घट्ट दूध 
1 कप सुखे खोबरे किस  
2 मोठे चमचे तूप 
1/2 कप बदाम, काजू, पिस्ता (काप केलेले) 
1/4 छोटा चमचा वेलची पूड 
 
कृती-
सीताफळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी सीताफळाचा गर काढून घ्यावा. आता एका पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये नारळाचा किस परतवून घ्यावा. आता यामध्ये सीताफळाचा गर आणि घट्ट दूध घालून  हे मिश्रण घट्ट होइसपर्यंत शिजवावे. आता यावर सुका मेवा आणि वेलची पूड घालावी आणि चांगल्या प्रकारे मिक्स करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर हाताला तूप लावून लाडू वळून घ्यावे. आता सुके खोबरे किस या लाडूंवर गार्निश करावा. तर चला तयार आहे आपले सीताफळाचे लाडू. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik