मसाला ताक : उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत
सामुग्री:
1 कप ताजं दही
1 कप पाणी
2 टेबल स्पून हिरवी कोथिंबीर
2 टेबल स्पून पुदीन्याची पाने
3/4 लहान चमचा काळं मीठ किंवा पांढरं मीठ
1/2 लहान चमचा जीरंपूड
1 हिरवी मिरची बारीक चिरलेली
आवडीप्रमाणे मिरपूड
आवडीप्रमाणे बर्फ
कृती
मसाला ताक तयार करण्यासाठी सर्वात आधी दही फेटून घ्या. यात पाणी घालून इतर सर्व जिन्नस घालून घ्या. आपण आलप्या आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि पुदीन्याचे पाने बारीक चिरुन किंवा वाटून घालू शकता. गार पिण्याची इच्छा असल्यास बर्फाचे तुकडे घाला किंवा जरा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवता येऊ शकतं.