1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

नाराळाचे सार

नाराळ
ND
साहित्य : 1 नारळ, आलं, आमसूल, मीठ, गूळ, जिरे, हिंग, कढीलिंब.

कृती : 1 नारळाचा चव काढून त्यात पाणी घालून तो मिक्सरमध्ये बारीक करावा. बारीक करत असतानाच त्यात आल्याचा तुकडा टाकावा. नंतर पिळून घेऊन दूध काढावे. चोथा टाकून द्यावा. दुधामध्ये आमसूल, मीठ, गूळ घालून उकळावे. जिरे, हिंग, कढीलिंब घालून तुपाची फोडणी द्यावी.