शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

रावणाचा सर्वनाश या लोकांनी दिलेल्या शापामुळे झाला

धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता, परंतु त्याचबरोबर तो अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाला त्याच्या जीवनकाळामध्ये अनेक लोकांनी शाप दिले आहेत. हेच शाप त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.
 
रघुवंशामध्ये परम प्रतापी अनरण्य नावाचा राजा होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा अनरण्य राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये अनरण्य राजाचा मृत्यू झाला. परंतु मृत्युपूर्वी अनरण्य राजाने रावणाला शाप दिला की, माझ्या वंशातील एक तरुण तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. यांच्या वंशामध्ये पुढे चालून भगवान श्रीरामाचा जन्म झाला आणि त्यांनी रावणाचा वध केला.
 
एकदा रावण महादेवाला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला होता. त्याठिकाणी नंदीला पाहून रावणाने नंदीच्या रुपाची खिल्ली उडवली आणि त्यांना वानरासारखे तोंड असलेला असे संबोधले. तेव्हा नंदीने रावणाला शाप दिला की, वानारांमुळेच तुझा सर्वनाश होईल.
 
रामायणानुसार, पुष्पक विमानातून भ्रमण करताना रावणाला एक सुंदर स्त्री दिसली तिचे नाव वेदवती असे होते. ती स्त्री विष्णूला पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडले आणि तिला सोबत चलण्यास सांगितले. त्याच क्षणी त्या तपस्विनीने स्वतःचा देहत्याग केला आणि रावणाला शाप दिला की, एका स्त्रीमुळे तुझा सर्वनाश होईल. त्याच स्त्रीने सीता स्वरुपात दुसरा जन्म घेतला.
 
विश्वविजयासाठी जेव्हा रावण स्वर्गात पोहचला तेव्हा तिथे त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. आपली वासना पूर्ण करण्यासाठी रावणाने तिला पकडले. तेव्हा त्या अप्सरेने रावणाला सांगितले की तुम्ही मला स्पर्श करू नये , मी तुमचा मोठा भाऊ कुबेराचा मुलगा नलकुबेरसाठी आरक्षित आहे. त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या पुत्रवधु समान आहे. पण रावणाचे तिचे काहीही एकले नाही आणि तिच्यासोबत दुराचार केला. ही गोष्ट नलकुबेराला समजली तेव्हा त्याने रावणाला शाप दिला की, रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श केला तर त्याच्या मस्तकाचे १०० तुकडे होतील.
 
रावणाची बहिण शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिन्न होते. तो कालकेय नावाच्या राजाचा सेनापती होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा कालकेय राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये रावणाने विद्युतजिन्नचा वध केला. तेव्हा शूर्पणखाने मनातल्या मनात रावणाला शाप दिला की, माझ्यामुळे तुझा सर्वनाश होईल.
 
रावणाने आपल्या पत्नीची मोठी बहिण मायासोबतही कपट कारस्थान केले होते. मायाचा पती शंभर वैजयंतपुरचे राजा होते. एकदा रावण शंभर राजाच्या भेटीला गेला होता. त्याठिकाणी रावणाने मायाला वाक्चातुर्यात अडकवले. ही गोष्ट जेव्हा शंभर राजाला समजली तेव्हा त्याने रावणाला बंदी बनवले. त्याचवेळी शंभर राजावर दशरथ राजाने आक्रमण केले. शंभर राजाचा या युद्धामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर माया सती जाऊ लागली, तेव्हा रावणाने तिला त्याच्यासोबत चलण्यास सांगितले. तेव्हा मायाने सांगितले की, तू वासनायुक्त होऊन माझे सतीत्व भंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला. आता तुझा मृत्यूही याच कारणामुळे होईल.