बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (14:55 IST)

सूर्यग्रहण : ग्रहणाच्या वेळी मंदिरं बंद ठेवायला का सांगितलं जातं? यामागे काही कारण आहे?

ग्रहणादरम्यान मंदिर बंद असेल हे वाक्य तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. आज (25 ऑक्टोबर) देशभरात सूर्यग्रहण आहे. नक्की कधी मंदिरं बंद असतील? किती वेळ मंदिरं बंद असतील, कधी मंदिरं उघडतील.
 
ग्रहण काळात बहुतांश मंदिरं बंद असतात. ग्रहण संपलं की मंदिरं उघडली जातात. पण आंध्र प्रदेशातलं हे मंदिर मात्र याला अपवाद आहे. ग्रहणाच्या दिवशीही हे मंदिर खुलं असतं. या मंदिराविषयी जाणून घेण्याआधी मंदिर ग्रहण काळात बंद का असतात समजून घेऊया
 
आईचा गर्भ हा अतिशय पवित्र समजला जातो. कारण ते निर्मितीचं केंद्र आहे. एक नवा जीव तिथे जन्माला येतो. त्याची सर्वतोपरी काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. मंदिर हे देवाचं स्थान आहे. देव या जगाचा निर्मितीकार मानला जातो. आईच्या गर्भाप्रमाणे देवाचं केंद्र म्हणजेच मंदिराचंही रक्षण करायला हवं, अशी भावना असते.
 
ग्रहणादरम्यान अनिष्ट शक्ती वातावरणात असतात. त्यामुळे मंदिरं बंद ठेवली जातात, असं पंचागाचे अभ्यासक डॉ. सी.व्हीबी.सुब्रमण्यम यांनी सांगितलं.
मंदिर बंद असण्याची अन्य कारणंही आहेत. कंगाटू सोमयाझ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगम आणि वैदिक शास्त्रांमध्ये यासंदर्भात उल्लेख आहे.
 
ब्राह्मणांनी दररोज संध्या आणि अग्निहोत्र यांचं पूजन करावं असं म्हटलं आहे. काही ब्राह्मण देवळात काम करतात. ग्रहण काळात अग्निहोत्राची पूजा होऊ शकत नाही. म्हणून ग्रहण काळात मंदिरं बंद ठेवली जातात.
काही आगमांनुसार मंदिरातही अग्निहोत्र करता येऊ शकतं. पण वैदिक शास्त्रामध्ये याबद्दल भिन्न मत आहे.
 
वैदिक शास्त्रानुसार, ब्राह्मण पतीपत्नीने अग्निहोत्राची घरी पूजा करणे आवश्यक असते. ब्राह्मणांनी कर्तव्याचं पालन करावं. स्वधर्माचं पालन न करणारे ब्राह्मणत्व गमावतात. त्यांना मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळत नाही.
 
म्हणूनच ग्रहणाच्या दिवशी मंदिरं बंद ठेवली जातात.
 
'हे' मंदिर ग्रहणातही खुलं असतं
तिरुपती जिल्ह्यातलं श्रीकालहस्ती मंदिर ग्रहण काळातही उघडं असतं. प्राचीन काळापासून ही पद्धत सुरू असल्याचं या मंदिरातील पुजारी सांगतात.
 
मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलं, श्रीकालहस्तीश्वेशरा स्वामी हे शिवाचं नाव आहे.
 
श्री म्हणजे गर्भ. कालम म्हणजे साप. हस्ती म्हणजे हत्ती. या तिन्ही गोष्टींचं पूजन केलं जातं. या तिन्हीचा शिवामध्ये एकत्रीकरण झाल्याचं मानलं जातं.
राहू केतू यांचा मंदिरात अधिवास असतो. श्रीकालहस्ती मंदिर राहू क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. राहू केतू सूर्य आणि चंद्राची ताकद अंगीकारतात. ग्रहण काळात विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. राहू केतू दोष दूर राहावा यासाठी भाविक या मंदिरात येऊन पूजा करतात.
 
स्वामी आणि अम्मा यांचं दर्शनही घेतलं तर राहूकेतू दोषाबरोबरच नवग्रह दोषही जातो अशी श्रद्धा आहे.
 
या मंदिराला 'दक्षिण कैलाश' म्हटलं जातं.
 
स्वामी आणि अम्मा यांचं वास्तव्य या मंदिरात असतं. क्षेत्र पुराणानुसार राहू आणि केतू यांच्यावर शंकराची सत्ता असते.
 
सात ग्रह दिशेने फिरत असतात. राहू आणि केतू उलट दिशेने फिरत असतात.
 
हे अपसव्यक्षेत्र आहे. इथे वेगळी परंपरा आहे. सैवगममधल्या अगोहोरा पद्धतीने
इथल्या देवांना नवग्रहाचं कवच असतं. यामुळे श्रीकालहस्ती मंदिराला ग्रहणदोष नसतो.
 
श्रीकालहस्ती मंदिराचा इतिहास
पुराणानुसार शंकर या मंदिरात वायूच्या इच्छेनुसार वायूलिंग म्हणून अवतरतो. कोळी, साप आणि हत्ती यांची पूजा होत असल्याने हे नाव मिळालं असावं अशीही आख्यायिका आहे. आंध्र प्रदेश सरकारनुसार, श्रीकालहस्ती मंदिर लोकप्रिय होण्याआधी स्थानिक आदिवासी पूजा करत. पल्लव आणि चोळ साम्राज्यातील राजांनी नवव्या शतकात इथे मंदिर बांधलं. कुलटोंग चोल यांनी मंदिराचं गोपूर बांधलं.
 
हे मंदिर विजयनगर 
साम्राज्याचा भाग होतं.1516 मध्ये गजपथांचा पराभव केला तेव्हा कृष्णदेवराय यांनी या मंदिरात राजगोपुरम बांधलं. 1529 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अच्युत राया यांचा इथे राज्याभिषेक झाला.
 
विजयनगर साम्राज्यात शैव आणि वैष्णव पंथाच्या तिरुपती, ताडिपत्री आणि पेनूकोडा या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मंदिरांच्या शैलीत साधर्म्य आहे.
 
Published By - Priya Dixit