Ganesh Chaturthi 2025 गणपती बाप्पाची स्थापना करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
गणेशोत्सव लवकरच सुरू होणार आहे. या वर्षी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ पासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सव देशभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रमध्ये या उत्सवाचे वैभव पाहण्यासारखे आहे. तसेच गणपती प्रतिष्ठापनेदरम्यान काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा पूजा फळ देत नाही.चाला तर जाणून घेऊया.
गणेशपूजेत या चुका टाळाव्या-
तुटलेल्या मूर्तीचा वापर
कोणत्याही देवतेची पूजा करताना, तुटलेली किंवा अपूर्ण मूर्ती वापरू नये. अशा मूर्तीची पूजा करणे अशुभ आणि दोषपूर्ण मानले जाते. जर तुम्ही घरी गणपतीची स्थापना आणि पूजा करणार असाल तर तुमची मूर्ती तुटलेली नाही याची विशेष काळजी घ्या.
तुळशी अर्पण करणे टाळावे-
श्री गणेशाला तुळशीची पाने अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. त्याऐवजी तुम्ही दुर्वा, लाल फुले आणि मोदक इत्यादी अर्पण करू शकता.
मूर्ती जमिनीवर ठवणे-
मूर्तीची स्थापना करताना, ती थेट जमिनीवर किंवा इतर कुठेही ठेवू नये. ती शुभ मानली जात नाही. मूर्ती नेहमी लाकडी स्टँडवर, लाल किंवा पिवळ्या कापडावर स्थापित करावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
चुकीच्या दिशेने ठेवणे-
गणेश प्रतिष्ठापनेच्या वेळी, आपण नेहमीच घराच्या ईशान्येकडे (ईशान कोपरा) किंवा उत्तर दिशेला तोंड करून मूर्तीची स्थापना करावी. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच भक्तांवर राहतो.
दक्षिणावरती शंख वापरण्यास मनाई
गणेशपूजेत दक्षिणावरती शंख वाजवणे अशुभ मानले जाते.
विसर्जनाच्या वेळी नियम न पाळणे-
गणेश प्रतिष्ठापनेसोबतच, विसर्जन पूर्ण विधी आणि मंत्रांचा जप करून देखील केले पाहिजे. पूजा न करता किंवा घाईघाईने विसर्जन करणे अशुभ मानले जाते.
Edited By- Dhanashri Naik