गणेशोउस्तव जवळ आला आहे. अश्यावेळेस अनेक लहान मुले आपल्या पालकांकडे हट्ट करतात की आपण घरीच गणपती बाप्पाची मूर्ती बनवून या. पण मग प्रश्न पडतो की, गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच घरीच गणपती बाप्पाची मूर्ती बनवू शकतात. घरीच गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवावी तर चला जाणून घेऊ या...
योग्य साहित्य
साध्या टिप्स आणि थोड्या मेहनतीने तुम्ही तुमच्या घरात बाप्पाची सुंदर मूर्ती बनवू शकता आणि उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवू शकता.
शाडू माती- ही पर्यावरणपूरक आहे आणि विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळते. शाडू माती ही बाजारात किंवा ऑनलाइन उपलब्ध असते.
पर्यायी साहित्य- पेपर मॅशे म्हणजेच कागदाचा लगदा, गव्हाचे पीठ, किंवा बेकिंग सोडा आणि कॉर्नस्टार्च मिश्रण वापरता येते.
रंग: नैसर्गिक रंग म्हणजेच हळद, कुंकू, बीट, पालकाचा रस वापरता येतो.
साधने: चाकू, स्केल, ब्रश, आणि मूर्ती घडवण्यासाठी छोटे साधने.
साधी रचना तयार करावी
कागदावर गणपतीच्या मूर्तीचा साधा आकार काढा. तसेच बसलेला किंवा उभा गणपती काढावा. आता साध्या मूर्तीसाठी 6-12 इंच उंची ठेवा. किंवा लहान मूर्ती देखील सोपी असते. आता लाकडाचा तुकडा किंवा पुठ्ठ्याचा आधार वापरून मूर्ती स्थिर ठेवा.
मूर्ती घडवण्याची प्रक्रिया
माती तयार करणे-शाडू माती पाण्यात मळून मऊ आणि लवचिक बनवा. जास्त पाणी टाळा. आता गणपतीच्या धडापासून सुरुवात करा. गोलाकार पोट आणि बसलेली मुद्रा बनवा. डोके, हात, पाय आणि सोंड वेगवेगळ्या भागांमध्ये बनवून जोडा. तसेच सोंड, कान आणि डोळ्यांना बारकाईने आकार द्या. आता दागिने, मुकुट, आणि मोदक यांसारखे छोटे तपशील मातीने किंवा इतर साहित्याने बनवा. तसेच मूर्ती 1-2 दिवस हवेशीर ठिकाणी वाळू द्या. तसेच सूर्यप्रकाश टाळा, कारण माती तडकू शकते.
रंग आणि सजावट
नैसर्गिक रंगांचा वापर करणे उत्तम असते. हळद, कुंकू किंवा बीटाचा रस वापरा. तसेच पातळ ब्रश वापरून डोळे, कपडे आणि दागिने रंगवा. आता चमकणारे दगड, छोटे कपडे, किंवा फुलांनी मूर्ती सजवा.
सुरक्षा-माती मळताना किंवा रंगवताना हातमोजे वापरा. तसेच मुलांना किंवा कुटुंबाला सामील करून हा अनुभव आनंददायी बनवा. तसेच घरगुती गणपती मूर्ती बनवणे हे पर्यावरण संरक्षण आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे.
Edited By- Dhanashri Naik