रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Ganesh Chaturthi 2025 चविष्ट मोदक आणि स्वादिष्ट प्रसाद,गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

Modak
गणपती बाप्पाला मोदक आणि प्रसादाचा नैवेद्य अर्पण करणे ही आपली परंपरा आहे. आपण काही खास स्वादिष्ट प्रसादाच्या रेसिपी पाहणार आहोत ज्या तुम्ही घरी नैवेद्यासाठी सहज बनवू शकता. 
चॉकलेट मोदक  
साहित्य-
एक वाटी- मिल्क चॉकलेट 
अर्धा वाटी- कंडेन्स्ड मिल्क
एक वाटी- खवा
१/४ वाटी- ड्राय फ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता 
एक चमचा-कोको पावडर 
 
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये चॉकलेट आणि कंडेन्स्ड मिल्क वितळवा. आता त्यात खवा आणि कोको पावडर घालून मंद आचेवर ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यावर ड्राय फ्रूट्स घाला आणि थंड करा. थंड झाल्यावर छोटे मोदक बनवा किंवा साच्यात घाला. कमीतकमी दीड तास फ्रिजमध्ये ठेवा. तर चला तयार आहे आपले चॉकलेटचे मोदक.
 
गूळ नारळाचे मोदक 
साहित्य-
एक कप- खोबरं कीस
अर्धा कप- खवा 
अर्धा कप- किसलेला गूळ
एक चमचे- वेलची पूड
एक कप-मैदा
अर्धा कप- रवा
दोन चमचे- तुप
 
कृती-
सर्वात आधी खवा हलका परतून घ्यावा. आता एका पातेल्यात खवा, खोबरं कीस, गूळ, वेलची पूड घालून मिक्स करा. एका बाउल मध्ये मैदा, रवा, तुप, घालून मिसळून जरा-जरा पाणी घालत पीठ मळून थोडावेळ झाकून ठेवावं. नाराळाच्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करुन घ्यावे. नंतर पाती लाटून सारण भरून मोदक वळून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करून नारळाचे मोदक मंद आचेवर तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट गूळ नारळाचे मोदक. 
 
स्वादिष्ट शेंगदाणा लाडू 
साहित्य-
दोन वाट्या- शेंगदाणे भाजून सोललेले 
१/५ वाटी- गूळ खवलेला 
एक चमचा- तूप
अर्धा चमचा-वेलची पूड
 
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे मिक्सरमध्ये दळून घ्या. आता तुपात गूळ वितळवून त्यात शेंगदाण्याची पूड आणि वेलची पूड घाला. मिश्रण थंड झाल्यावर लहान लाडू वळा.
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.  तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट शेंगदाणा लाडू.
 
नारळाची बर्फी 
साहित्य-
दोन वाट्या खोबरं खवलेलं
१/५ वाटी- साखर
अर्धा वाटी- दूध
एक चमचा- तूप
अर्धा चमचा- वेलची पूड
केशर दुधात भिजवलेले 
 
कृती-
सर्वात आधी तुपात खोबरं हलकंसं परतून घ्या. आता एका पॅनमध्ये साखर आणि दूध उकळून त्यात खोबरं घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. वेलची पूड आणि केशर घाला. तुपाने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये मिश्रण पसरवून थंड करा. थंड झाल्यावर चौकोनी तुकडे करा. तर चला तयार आहे आपली स्वादिष्ट नारळाची बर्फी. 
 
बेसनाचे मोदक
साहित्य-
दोन वाट्या- बेसन 
एक वाटी- तूप  
एक कप- पिठी साखर  
अर्धा चमचा- वेलची पूड  
केशर धागे  
 
कृती-
एका कढईमध्ये तूप गरम करून घयावे. मग त्यामध्ये बेसन घालून मंद आचेवर चांगले परतून घयावे. बेसनचा सोनेरी रंग झाल्यावर दुसऱ्या भांड्यात काढावे. व थंड करून त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालावी. सर्व साहित्य मिक्स करून मिश्रण तयार करावे. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यात ओतून मोदक तयार करा. जर तुमच्याकडे साचा नसेल तर या मिश्रणाला हाताने मोदकांचा आकार द्या. तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट बेसनाचे मोदक. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik