बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:18 IST)

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे मुंढेंना ही धमकी देण्यात आली आहे. मुंढेंनी याबाबत स्वारगेट पोलिस स्टेशन गाठत यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

पीएमपीमध्ये तुम्ही केलेली भाडेवाढ समर्थनीय नाही, तुम्ही केलेल्या भाडेवाडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे लवकरात लवकर भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तुमचं आयुष्य उद्धस्त करु, तसंच तुमच्या कुटुंबाचंही बरं-वाईट करु असं पत्रात सांगण्यात आलं. भुजंगराव मोहिते असं पत्र लिहिणाऱ्याचं नाव पत्रात नमूद करण्यात आलं असून सुखसागर नगर पुणे असा पत्ताही पत्रात लिहिण्यात आला आहे