राजसाहेब, मला माफ करा म्हणत केली आत्महत्या
किनवट येथील मनसेचे शहरप्रमुख सुनील आनंदराव ईरावार यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका, असा उल्लेख केला आहे.
सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर असे लिहित नंतर संपूर्ण कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच पत्रात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे.
सुसाईड नोटमध्ये याप्रकारे लिहिले आहे की-
“अखेरचा जय महाराष्ट्र“
यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका.”
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत.
जय महाराष्ट्र
जय राजसाहेब
जय मनसे
“ आई मला माफ कर
तुझाचं - सुनिल
आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पु दादा मला माहित आहे मी माफ करायच्या लायकीचा नाही, तरीपण तुम्ही मला माफ करशाल अशी अपेक्षा बाळगतो.
यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.