मिरजेत घरफोडी करणारी चोरट्य़ांची टोळी गजाआड चार लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त
शहरातील सुंदरनगर येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार चोरट्य़ांच्या टोळीला गजाआड करण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा चोरट्य़ांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दोन लाख, 40 हजार रुपयांच्या मुद्देमालासह एक रिक्षा असा चार लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त केला आहे.
अनिस अलताफ सौदागर (वय 25, रा. दुर्गानगर, कुपवाड), वैभव आवळे, नेहाल मोमीन, समर्थ गायकवाड (सर्व रा. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्य़ांची नांवे आहेत. पोलिसांनी सदर चोरट्य़ांकडून 85 हजारांची 65 इंची एलईडी टीव्ही, 30 हजारांची 32 इंची एलईडी टीव्ही, 45 हजारांची 42 इंची एलईडी टीव्ही, 20 हजारांचा लॅपटॉप, 15 हजारांचा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, वेरणा व इनोव्हा चारचाकी वाहनाच्या चाव्या अशा दोन लाख 40 हजारांच्या चोरीच्या साहित्यासह दोन लाख रुपये किंमतीची रिक्षा असा चार लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त केला.