1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (08:52 IST)

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपये देत आहे मोदी सरकार? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

Modi government is giving Rs 4000 to all youths for treatment of corona virus? Know the complete 'truth' Coronavirus News National News In Marathi Webdunia Marathi
सोशल मीडियावर एक बातमी सध्या वेगाने वायरल होत आहे. या बातमीत म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मोदी सरकार प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना (Pradhanmantri Ramban Suraksha Yojana) अंतर्गत 4000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे.हा दावा खरा आहे की खोटा याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने हा दावा बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारद्वारे अशी कोणतीही योजना चालवली जात नाही.
 
काय केला जात आहे दावा
वायरल बातमीत दावा करण्यात आला आहे की,प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या अंतर्गत कोरोना व्हायरसच्या निःशुल्कउपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपयांची मदत रक्कम मिळेल.
 
रजिस्ट्रेशन करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म भरा. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे, त्वरा करा. मला 4000 रुपये मिळाले. तुम्ही सुद्धा दिलेल्या लिंकवरून अर्ज प्राप्त करा.
 
‘PIB फॅक्ट चेक’ने काय म्हटले?
सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या मेसेजचे फॅक्ट चेक केले.फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे की मोदी सरकारद्वारे अशी कोणतीही योजना (प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना) चालवली जात नाही.अशा बनावट वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती शेयर करू नका.