शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (23:23 IST)

भारतीय मुलीला वयाच्या 14 व्या वर्षी नासा फेलोशिप मिळाली, कृष्णविवर आणि गॉड यावर सिद्धांत लिहिला

14 वर्षीय दीक्षा शिंदे, जी मूळची औरंगाबाद, महाराष्ट्रातील आहेत, तिने तरुण वयात मोठी कामगिरी केली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी दीक्षा शिंदेची निवड झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, तिला नासाची ही फेलोशिप कशी मिळाली हे सांगितले. दीक्षा शिंदे हिने सांगितले की तिने कृष्णविवर आणि गॉड यावर एक सिद्धांत लिहिला आहे.
 
तीन प्रयत्नांनंतर नासाने ते स्वीकारले. दीक्षा म्हणाली की त्यांनी मला त्यांच्या वेबसाइटसाठी एक लेख लिहिण्यास सांगितले होते. नासामध्ये निवड झाल्यानंतर दीक्षाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
 
तासाभरापूर्वी शेअर केलेल्या या पोस्टाला आतापर्यंत 4000 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. बऱ्याचं लोकांनी तिला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिला शुभेच्छा दिल्या. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की ती भारताची उज्ज्वल भविष्य आहेत. तसेच एकाने शानदार म्हटले.