शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:38 IST)

पतीच्या प्रेयसीला पत्नीने धू धू धुतले

पतीच्या वागण्या संशय होता म्हणून पत्नीने पतीवर पाळत ठेवली. पतीचा पाठलाग केला पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग मैत्रीणीची धुलाई केली. रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला तिने धू धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
 
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ औरंगाबादमधल्या सिडको परिसरातील गणपती मंदिर परिसर येथील आहे. एका महिलेला पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पतीवर पाळत ठेवली होती. पाळत ठेवून पतीचा पाठलाग केला आणि पती आणि पतीची प्रेयसी गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमध्ये जाण्यासाठी थांबातच त्यांना रोखले.
 
दोघांना एकत्र येऊन पाहून महिलेला राग अनावर झाला. यावेळी संतापलेल्या पत्नीने रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला पकडले आणि मग शिव्या घालत धू धू धुतले. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा औरंगाबादेतील हा व्हिडीओ साध्य सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत आहे.
 
काही वेळानंतर नागरिकांनी हस्तक्षेप करुन भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या रागामुळे पतीची आणि मैत्रिणीची चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.
 
हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.