मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (08:04 IST)

राज कुन्द्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ ऑगस्टला होणार सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020मध्ये नोंदवलेल्या एका गुन्हात राज कुंद्राला अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यातील सहआरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व ७ वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी दिली पाहिजे. असा युक्तिवाद कुंद्राच्या वकिलांनी केला. त्यानंतर के. शिंदे यांनी कुंद्राला अटक होण्यापासून संरक्षण देणारा अंतरिम आदेश देत सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
 
२०२० च्या प्रकरणात राज कुंद्रा याने गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. राज यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांनाही जामीन मंजूर करण्यात यावा. उच्च न्यायालयात याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला की या प्रकरणात कुंद्राची भूमिका या प्रकरणातील इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यांनी अर्जाबाबत पुढील निर्देश मिळवण्यासाठी वेळ मागितला. न्यायमूर्ती शिंदे यांनी त्याला वेळ दिला. कुंद्राला पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे निर्देश दिले.राज कुंद्राला जुलै महिन्यात अश्लील चित्रफितीवरून अटक करण्यात आली होती. सध्या तो तुरुंगात आहे.