Festival Posters
✕

Rani Lakshmi Bai Punyatithi 2026 Speech in Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी भाषण

Updated: सोमवार, 15 जून 2026 (17:14 IST)
 
१९ नोव्हेंबर १८३५ रोजी काशी येथे राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव 'मनुबाई' होते. लहान वयातच आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांनी त्यांचा सांभाळ केला. मनुबाईंना तलवारीचे हात, घोडेस्वारी आणि युद्धकलेचे शिक्षण मिळाले. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि त्या झाशीची राणी 'लक्ष्मीबाई' बनल्या.
 
लहान वयातच पतीचे निधन झाल्यामुळे झाशीवर मोठे संकट आले. इंग्रजांनी 'दत्तक वारस नामंजूर' हे धोरण राबवून झाशी संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राणी लक्ष्मीबाईंनी हार मानली नाही. त्यांनी छातीठोकपणे इंग्रजांना आव्हान दिले आणि "मी माझी झाशी कोणत्याही किंमतीवर देणार नाही!" अशी सिंहगर्जना केली.
 
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या पाठीवर दत्तक पुत्र दामोदररावाला बांधून रणांगणात तलवारी चालवल्या. त्या शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी शूरतेने लढल्या आणि १७ जून १८५८ रोजी देशासाठी वीरमरण पत्करले.
 
राणी लक्ष्मीबाई या केवळ एक स्त्री नव्हत्या, तर त्या भारतातील क्रांती आणि शौर्याचे प्रतीक होत्या. त्यांचा हा त्याग आणि देशभक्ती आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे.
 
"खूब लडी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी!"
जय हिंद! जय भारत!
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments