बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. इव्हेंट वार्ता
Written By वेबदुनिया|

वेबदुनियाची प्रचार मोहिम आता मुंबईत

WDWD
अल्पावधीतच अग्रगण्य ठरलेल्या मराठी.वेबदुनिया. कॉम हे पोर्टल मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार प्रसिद्धी मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत आता मुंबईतील मराठी लोकांपर्यंत ही ऑनलाईन वाचन चळवळ पोहोचविण्यासाठी जाहिरातींचा आधार घेतला जात आहे. विविध वृत्तपत्रातून वेबदुनिया वाचकांपर्यंत पोहोचत आहे.

वेबदुनियाने गेल्या वर्षी हे पोर्टल सुरू केले तेव्हापासून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पोर्टलमध्ये विविध विषयांना स्पर्श केलेला आहे. ताज्या बातम्यांबरोबरच चालू घडामोडींवरील लेख, करीयर, आयटी, धर्म, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, सौंदर्य, भटकंती यासह अनेक विषयांवरील विशेष विभाग यात आहेत. विविध विषयांची माहिती देणारे एवढे मोठे संकेतस्थळ मराठीत दुसरे नाही. त्यामुळे वेबदुनियाकडे वाचकांचा ओढा वाढतच आहे.

स्वतःला व्यक्त करण्याचा 'कॅनव्हास'
इंटरनेटने आजच्या तरूणाईला स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक कॅनव्हास उपलब्ध करून दिला आहे. वेबदुनियाने या पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त करण्यासाठी नवोदितांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाईन गेम्स, अभिव्यक्तीसाठी ब्लॉग, करीयरचा विशेष विभाग, एसएमएस सेवा, भाषक ई-मेल सेवा आणि प्रश्नोत्तरांसाठीची 'क्वेस्ट' ही अभिनव सुविधा ही सगळी वेबदुनियाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. क्लासीफाईड, क्वेस्ट, ई-मेल या नाविन्यपूर्ण सेवा प्रथमच मराठीत देण्याबरोबरच जन्मकुंडली, पत्रिका जुळवणी या सेवाही सहजगत्या आणि अगदी मोफत आपल्या मातृभाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रातील मंडळीही आपल्या विद्यार्थ्यांना माहिती देणारा, मनोरंजन करणारा मजकूर देण्याच्या शोधात आहेत. वेबदुनियाची टिम हा मजकूर एकत्रित स्वरूपात एकाच पोर्टलवर मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे. भरगच्च असा करीयरचा विभाग विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.