शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

साबुदाण्याच्या पुर्‍या

साहित्य : 1 कप भिजलेला साबुदाणा    
1 कप शिंगाड्याचा आटा     
2 बटाटे उकडलेले  
2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या  
कोथिंबीर बारीक चिरलेली  
काळे मीठ चवीनुसार  
चिमूटभर काळ्यामिर्‍याची पूड  
1 कप तूप  
विधी - सर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, उरलेले मसाले घालून पिठाला मळून घ्या. आता हाताला पाणी लावून छोट्या छोट्या गोळ्या करून त्याच्या पुर्‍या तयार करून तुपात तळून घ्या. जर हाताने चांगल्या प्रकारे पुर्‍या बनत नसतील तर थोडेसे शिंगाड्याचे पीठ लावून त्या लाटून घ्या. आता कढईत तूप गरम करून त्यात पुर्‍या तळून घ्या. गरमा गरम साबुदाण्याच्या पुर्‍या तयार आहे. तुम्ही याला चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.