मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Updated : सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (10:06 IST)

उपवासाचे साबुदाणा मोमोज

momos
साहित्य-
एक कप साबुदाणा भिजवलेला 
तीन बटाटे उकडलेले 
अर्धा कप शेंगदाणा कूट 
तीन हिरवी मिरची बारीक चिरलेली 
चवीनुसार सेंधव मीठ  
तीन चमचे शुद्ध तूप 
दोन चमचे हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर 
आवश्यकतेनुसार पाणी 
 
कृती-
सर्वात आधी साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यावा व चार ते पाच तासांकरिता भिजत ठेवावा.  त्यानंतर मॅश केलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, सेंधव मीठ आणि कोथिंबीर मिक्स करावी आता भिजवलेला साबुदाणा मॅश करून त्याला मोमोज सारखा आकार द्यावा आता बटाट्याचे मिश्रण तयार केलेल्या आकारात भरावे व व्यवस्थित पॅक करावे आता मोमोज स्टीम करून हलकेसे तुपामध्ये फ्राय करावे तर चला तयार आहे आपले साबुदाणा मोमोज जे तुम्ही हिरवी चटणी किंवा दही सॊबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik