बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By रूपाली बर्वे|

बाबा म्हणजे... वडिलांवर सुंदर कविता

बाबा म्हणजे आत्मविश्वास
बाबा म्हणजे मोकळा श्वास
 
बाबा म्हणजे आकाश
बाबा म्हणजे प्रकाश
 
बाबा म्हणजे धैर्य
बाबा म्हणजे शौर्य
 
बाबा म्हणजे छत्र
बाबा म्हणजे मित्र
 
बाबा म्हणजे आधार
बाबा म्हणजे विचार
 
बाबा म्हणजे स्फूर्ती
बाबा म्हणजे प्रेमळ मूर्ती
 
बाबा म्हणजे शिस्त
बाबा म्हणजे मस्त
 
बाबा म्हणजे निर्भय
बाबा म्हणजे अभय
 
बाबा म्हणजे सावली
बाबा म्हणजे माऊली