रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (17:30 IST)

Feng Shui Tips उंट योग्य दिशेला ठेवल्याने माणूस राजा होतो

भारतीय वास्तु शास्त्र प्रकारे चीनी वास्तु शास्त्र फेंगशुई मध्ये देखील सुख-समृद्धी प्राप्तीचे अनेक मार्ग दर्शवण्यात येतात. तसं तर फेंगशुई हे ऐकल्यावर लोकांच्या मनात कासव (Feng Shui Tortoise), लॉफिंग बुद्धा (Fengshui Laughing Budha), क्रिस्टल (Fengshui Cristal), विंड चाइम्स (Feng Shui Wind Chimes) सारख्या गोष्टी येतात परंतु या व्यतिरिक्त एक अजून जनावर आहे ज्याला फेंगशुईत शुभ मानले गेले आहे. कासवाप्रमाणेच ऊंट देखील करियर-व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे.
 
फेंगशुईनुसार, उंटाची मूर्ती योग्य दिशेने ठेवताच आर्थिक सुधारणा दिसू लागते आणि बघता बघता माणूस रंक ते राजा बनतो. चला जाणून घेऊया फेंगशुई उंटा संबंधित काही खास गोष्टी.
 
फेंगशुईमध्ये उंटाला शुभ मानले जाते
फेंगशुईमध्ये कासव आणि लाफिंग बुद्धाप्रमाणे उंटालाही शुभ मानले जाते. फेंगशुई उंट विशेषतः व्यवसाय, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ही मूर्ती कार्यालय किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवताच लगेच फरक दिसून येतो, असे जाणकारांचे मत आहे.
 
व्यवसायाच्या ठिकाणी उंटाची मूर्ती लावल्यास कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते, असे म्हणतात. दुसरीकडे, जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत उंटाची मूर्ती ठेवली तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू लागते.
 
फोकस वाढतो
फेंगशुईनुसार ऑफिसमध्ये उंटाची मूर्ती ठेवल्याने कामावर लक्ष केंद्रित होते आणि करिअर चांगले होते. एवढेच नाही तर फेंगशुईमध्ये असे सांगितले आहे की घरात उंटाची जोडी ठेवल्याने उत्पन्न वाढते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.
 
घरामध्ये धनसंपत्ती वाढवायची असेल तर घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला दोन उंटांचे चित्र किंवा मूर्ती लावणे चांगले. असे म्हणतात की यामुळे घरात सुख-शांती निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात अडचणी कमी होऊ लागतात.