आपल्या घराच्या आतंरिक सौंदर्यात वाढ होण्याच्या दृष्टीने आपण घरात वेगवेगळ्या वस्तूंच्या आधारे घर सजविण्यासाठी उठाठेव करत असतो. काही घरात फिशपॉट दिवाणखान्यात ठेवलेले दिसतात. चीनी वास्तुशास्त्रात घरात फिशपॉट ठेवणे शुभ मानले जाते. आणखी त्यात असे म्हयले आहे की, फिशपॉटमध्ये गोल्डफिश जातीचे मासे ठेवणे, हा सद्भाग्यामध्ये वृद्धी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
माशांच्या पॉटमध्ये एकूण नऊ मासे ठेवावेत. त्यापैकी आठ मासे लाल किंवा सोनेरी रंगाचे व एक मासा हा काळ्या रंगाचा पाहिजे. या नऊ माशांमधील एखादा गोल्डफिश मासा मेला तर घाबरून जाऊ नका. तो मासा मरतो म्हणजे आपल्या मागची इडापिडा, भविष्यात येणारे संकट घेवून जातो. त्यांच्या जागी एक नवीन गोल्डफिश मासा पॉटमध्ये टाकावा. काही दिवसांत जर पॉटमधील मासा मरण पावला नाही तर कुटुंबातील एका व्यक्तीवर आपत्ती येते.
गोल्डफिश असलेला फिशपॉट दिवाणखान्याव्यतिरिक्त घरातील बेडरूम, स्वयंपाक घरात कधीही ठेवू नये. तसे केल्यात संपत्तीचे मोठे नुकसान तुम्ही वाचवू शकतात. दिवाणखान्यात फिशपॉट ठेवण्यासाठी पूर्व, आग्नेय व उत्तर दिशा शुभ मानल्या जातात. पाण्याने भरलेली वस्तू घरात ठेवल्याने आपला उदयन काळ सुरू होऊन भाग्य उजळते. मात्र, त्या वस्तूची जागा चुकीची असली तर ती त्या कुटुंबाला हानिकारक ठरू शकते. दरवाज्याच्या उजव्या बाजूस फिशपॉट चुकूनही ठेवू नये. त्याला घराच्या दिवाणखान्यात दर्शनी भागात ठेवले पाहिजे. तसेच घराच्या भिंतीवर निळ्या पाण्यामध्ये वर उडी मारणाऱ्या डॉल्फिनचे ही चित्र लावू शकतात. गोल्डफिश माशांचे पॉट घरात ठेवणे चांगल्या भाग्याचे लक्षण मानले जाते.