- मराठी ज्योतिष
» - फेंगशुई
» - फेंगशुई आर्टीकल
फेंगशुई आणि घरातील शिडी
जर घरात वास्तुदोष असेल तर मनुष्याला त्याच्या भाग्यातील अर्धेच फळ मिळते. त्यामुळे व्यक्तिमधील मानसिक तणाव वाढून त्याच्यातील आत्मविश्वासात कमी कमी होत जातो. घर बांधताना जर वास्तुशास्त्राच्या आधारे बांधले असेल तर मनुष्याला त्याचा चांगलाच फायदा होतो.वास्तुशास्त्राच्या आधारे बांधलेल्या घरात एक वेगळी ऊर्जा प्रवाहित होऊन वैभव आणि शांती मिळते. घर बांधत असतांना शिडीला फार महत्व आहे. घरातील शिडी एका जागेवरून दुसर्या जागेवर घेऊन जाते. म्हणून िशडीची दिशा, बनावट व शिडीला असलेल्या पायर्यांची संख्या लक्षात घेतल्या तर घरात वावरणार्या शांतीत भर नक्कीच पडते. * शिडी नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे उंचावर जाणार्या पाहिजे. या प्रकारे पूर्व व उत्तरेकडील प्रकाश संपूर्ण घरात पसरत जातो.* जर घरात पूर्वेकडून पश्चिमकडे चढणारी शिडी असेल तर घरमालकाला यश व समृद्धी प्राप्त होते.* घरात जर उत्तर ते दक्षिण दिशांकडे जाणारी शिडी असेल तर घर मालकाला धनप्राप्ती होते.* शिडी ही पांढरी व रूंद असली पाहिजे. शिडीला असलेल्या पायर्या संख्या जर विषम असली तर त्या शुभ मानल्या जातात. * साधारण एका मजल्यासाठी शिडीला किमान 17 पायर्या असल्या पाहिजे.* वर्तुळाकार वर घेऊन जाणारी शिडी श्रेष्ठ समजली जाते. पायर्यांचा घेर घड्याळसारखा असला पाहिजे.* पायर्या जर सरळ असल्या तर उजव्या बाजूने वर जाणार्या हव्यात.* चुकून घराच्या मध्यभागी शिडी बांधली तर मोठे संकट येऊ शकते. * ईशान्य दिशेच्या कोपर्यात बनलेल्या शिडी संततीच्या विकासात बाधा निर्माण करतात.* मुख्य प्रवेशद्वारासमोर तयार केलेल्या पायर्यामुळे आर्थिक संकटे दूर करतात.* घरात असलेल्या शिडीखाली देवघर नसावे* घर बांधताना ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवले पाहिजे की प्रवेश द्वारासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला घरातील शिडी दिसायला नको.