शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

फेंगशुई आणि पती-पत्नी

फेंगशुई आणि पतीपत्नी
ND
हल्लीच्या धावपळीच्या जीवन काळात प्रत्येक दाम्पत्यात काही ना काही तणाव असतो. या तणावामुळे त्यांच्या संबंधात नीरसता येते. कधी कधी तर हे संबंध तुटतील की काय असे वाटायला लागते. बायकोचे माहेरी जाणे, घटस्फोट घेण्याची पाळी येणे हे प्रकार घडतात. फेंगशुईच्या उपायांमुळे पती-पत्नीमधील तणाव कमी होऊ शकतो.

फेंगशुईनुसार दक्षिण-पश्चिम नैऋत्य दिशा, विवाह, प्रेम व आपसातील संबंधांची दिशा आहे. म्हणून सुखद दाम्पत्य जीवनासाठी बेडरूमला ऊर्जामय करण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री लाल किंवा पिवळ्या मेणबत्त्या, दिवा किंवा लँप लावल्याने फेंगशुईच्या येंग ऊर्जेचा उदय होतो. ही उर्जा प्रेम व शांतीचे प्रतीक आहे.

पती-पत्नी यांना आपले प्रेम संबंध कायम राखण्यासाठी एका चौकोनी भांड्यात पाणी भरून त्यात दिव्याच्या आकाराच्या 4-5 लाल किंवा पिवळ्या मेणबत्त्या लावून त्या पाण्यात सोडाव्या. या भांड्यात कुठलेही 7 रत्न, लाकडाचा एक लहान तुकडा, गुलाब, झेंडू किंवा चमेलीचे फूल किंवा सोने व चांदीची अंगठी यात टाकावी.

ND
या भांड्याला बैठकीत एखाद्या टेबलावर ठेवावे. हे सृष्टीतील 5 घटकांचे प्रतिनिधित्व करतात. यात जळत असलेली मेणबत्ती अग्नी तत्त्वाची, रत्न पृथ्वीचे, पाणी जल तत्त्वाचे, सोनं, चांदी आणि लाकूड काष्ठ तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. अविवाहित मुलांनी एक महिना हे भांडे दरवाजात ठेवल्यास मनपसंत वधूचा शोध संपतो. अविवाहित मुलींनी शयनकक्षेत दीड महिना हे भांडे ठेवले तर त्यांना मना योग्य वर मिळतो. दाम्पत्य जीवन प्रबळ करण्यासाठी झोपण्याच्या खोलीत पलंगाची जागा दाराच्या समोर नसावी. झोपताना डोके किंवा पाय दारासमोर असेल तर पत्नी कधीही संतुष्ट राहत नाही. हळू हळू त्यांच्या संबंधांत वैमनस्य निर्माण होते.

शयनकक्षेत टी. व्ही. किंवा कॉम्प्युटर ठेवल्यानेसुद्धा दांपत्य जीवनात अरुची उत्पन्न होते. म्हणून खोलीत ह्या वस्तू ठेवण्यास टाळायला पाहिजे. जर या वस्तू ठेवणे फारच गरजेच्या असेल तर काम झाल्यावर त्यांना जाड कपड्यांनी झाकले पाहिजे.

ND
फेंगशुईमध्ये क्रिस्टल व स्टफिकला सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असे म्हटले आहे. क्रिस्टलमध्ये बरेच कट असल्यामुळे पूर्ण खोलीत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. शयनकक्षेत उत्तर-पश्चिम दिशेत जर क्रिस्टल लावलं तर पती-पत्नीच्या संबंध गाढ होतात.

शयन कक्षेत आरसा गरजेचा असेल तर तो पूर्व किंवा उत्तरमुखी असावा. या आरशामुळे घरात सुख शांती नांदते. खोलीत गोल आरसा लावला असेल तर पलंगाचे प्रतिबिंब त्या आरशात दिसायला नको. जर असे होत असेल तर झोपताना आरसा झाकून ठेवा. हे उपाय प्रत्यक्षात आणले तर नक्कीच लाभ होईल.