शनिवार, 15 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (15:05 IST)

फेंगशुई : घरात ठेवा सोनेरी मासोळी

fengshuie tips
सोनेरी मासोळी एक विशेष प्रकारच्या चमकदार सोनेरी रंगाची असते, जी दिसायला फारच सुंदर असते. हिच्या रंगात लाल आणि पिवळा संग सामील असतो. या मासोळीची खासियत अशी असते की हिच्या आजू बाजूची ऊर्जा सकारात्मक असेल तर हिचा रंग जास्त सोनेरी होतो. आणि जर नकारात्मक किंवा दूषित ऊर्जा असली तर हिचा रंग फिका पडतो. तुमच्या एक्वेरियममध्ये जर ही मासोळी असेल तर या गोष्टीचे लक्ष्य ठेवणे फारच गरजेचे असून हिच्या रंगावर लक्ष्य ठेवणे महत्त्वाचे आहे. या मासोळीच्या स्वभावाकडे जर आपण लक्ष्य दिले तर आपल्याला कळेल की ह्या मासोळ्या स्वत:मध्ये गुंग राहणार्‍या असतात. कधी कधीतर पोहता पोहता एकदम जोराने हरकत करतात आणि मग त्या शांत होतात. याचे मुख्य कारण असे आहे की जसेच यांना दूषित ऊर्जेचा आभास होतो, त्या त्याला ग्रहण करण्यासाठी धावतात   आणि त्याला समाप्त करून शांत होऊन जातात. ह्या मासोळ्या नेहमी स्वच्छ पाण्यात राहणे पसंत करतात म्हणून हिचे घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. फेंगशुईनुसार यांना घरात ठेवल्याने शुभता प्राप्त होते.