आपण यश मिळविण्यासाठी अपार मेहनत करतो. दिवस-रात्र एक करतो. तरीही अनेकदा यश मिळत नाही. अनेकदा याचे मुख्य कारण तुमच्या घरातही असू शकते. वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी फेंगशुईचा आधार घ्यायला हवा. फेंगशुई साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. यासंदर्भात खालील टिप्सचा वापर करा.
* वास्तुदोष दूर करण्यासाठी फेंगशुईतील कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर रहातात.
* करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा.
* कासव स्वतः दीर्घायुषी असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते.
* कासव शयनकक्षात ठेवाल्यास त्याला पाण्याची आवश्यक्ताही नसते.
* ड्रॅगनच्या तोंडाचे कासवही उत्तम फलदायी असते.
* ड्रॅगनच्या तोंडाचे कासव सौभाग्याचे प्रतीक आहे. म्हणून त्याला शयनकक्षात ठेवू नये. बैठकीची खोली ही त्यासाठी उत्तम जागा आहे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास चांगलेच.
* ऑफिसमध्ये ठेवल्यास आपल्या खुर्चीच्या मागे उजवीकडे ठेवावे.