रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: ब्रोनिस्टी , मंगळवार, 12 जून 2018 (12:28 IST)

विश्वचषक स्पर्धेवर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून

अर्जेंटिनाचा संघ रशियात खेळल जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कसा खेळ करतो, त्यावर अर्जेंटिनाच्या फुटबॉलचे भवितव्य अवलंबून राहील, असे कर्णधार लिओनेल मेस्सी याने सांगितले.
 
मेस्सी हा मुलाखत देत होता. आम्ही कशी कामगिरी करतो हे फार महत्त्वाचे राहणार आहे. अर्जेंटिनाला ओळीने तीनवेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आम्हाला पत्रकारांशी बोलताना काही वेळा अडचणीचे ठरते, अशी भर बार्सिलोनाच्या आघाडीच्या फळीतील या खेळाडूने सांगितले.
 
मुलाखत देताना ही अडचण आली. कारण आमच्यामध्ये या तीन अंतिम सामन्यांविषयी वेगवेगळी मतप्रवाह आहेत. अर्जेंटिनाला 2014 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीशी खेळताना जादा वेळेत 1-0 असा पराभव पत्करावा लागला. कोपा अमेरिका स्पर्धेत 2015 व 2016 अर्जेंटिना अंतिम सामन्यात लागोपाठ चिलीकडून पेनल्टीत पराभूत झाला, असे तो म्हणाला.
 
मेस्सी हा विश्वचषक स्पर्धेत खेळताना 31 व्या वर्षात पदार्पण करेल. स्पेन, ब्राझील, फ्रान्स आणि बेल्जियम हे चार संघ रशियात खेळल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतील, असेही मेस्सीने सांगितले.
 
या स्पर्धेत बरेच संघ मोठ्या विश्वासासह रशियात दाखल झाले आहेत. सांघिक आणि वैयक्तिक कौशल्यावर या संघांचा भर राहणार आहे, असे पाच वेळा सर्वोत्तम जागतिक खेळाडूचा पुरस्कार पटकाविणार्‍या मेस्सीने स्पष्ट केले. अर्जेंटिनाचा संघ शनिवार, 16 जून रोजी मॉस्को येथे आइसलँडविरुध्दच्या सामन्याने विश्वचषक फुटबॉल मोहिमेस सुरुवात करणार आहे. त्यानंतर अर्जेंटिना संघ ड गटातील उर्वरित दोन सामने क्रोएशिया व नाजेरियाशी खेळेल.
 
कोणत्याही आफ्रिकन संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपान्त्पूर्व फेरीच्या पुढे मजल मारलेली नाही. यावेळी या स्पर्धेत अनेक संघात तरुण व कुशल खेळाडूंचा समावेश झालेला आहे. अर्जेंटिनाचा संघ यावेळच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार असणार नाही. कारण बरेच अनुभवी खेळाडू आच संघात नाहीत, परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे, असे मेस्सी म्हणाला.