सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Updated :बोगोटा , सोमवार, 11 जून 2018 (11:25 IST)

दुखापतीमुळे फाबरा विश्वचषकाबाहेर

कोलंबियाचा बचावपटू फ्रँक फाबरा याला गंभीर अशी गुडघा दुखापत झाली. या दुखापतीमुळे रशिया येथे 14 जूनपासून खेळल्या जाणार्‍या फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून तो बाहेर पडला. द. अमेरिकेचा कोलंबिया संघ रशियाला रवाना होण्यापूर्वी फाबराला दुखापत झाल्याचे कोलंबियन असोसिएशनने सांगितले. बोका ज्युनिअर्सकडून खेळणारा फाबरा याला इटलीत प्रशिक्षण घेताना दुखापत झाल्याचे असोसिएशनने सांगितले. कठोर मेहनत घेतली; परंतु दुखापतीने पाणी फेरले असे फाबरा म्हणाला.