1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (09:59 IST)

Qatar vs Ecuador: कतारचा इक्वेडोरने पराभव केला

फिफा विश्वचषकाचा पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात झाला. सलामीच्या लढतीत इक्वेडोरने त्यांचा २-० ने पराभव केला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान संघाला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता पुढच्या दोन सामन्यात नेदरलँड्स आणि सेनेगलविरुद्धच्या अपसेटवर कतारची नजर असेल.
 
यजमान कतारला सलामीच्या लढतीत इक्वेडोरविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अल बायत स्टेडियमवर त्याला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. अ गटातील हा सामना जिंकून इक्वेडोरने तीन गुण मिळवले आहेत. इक्वेडोरसाठी कर्णधार एनर व्हॅलेन्सियाने दोन्ही गोल केले. विश्वचषकात चार सामन्यांत त्याने एकूण पाच गोल केले आहेत. या पराभवानंतर कतारच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
 
विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान संघाला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता पुढच्या दोन सामन्यात नेदरलँड्स आणि सेनेगलविरुद्धच्या अपसेटवर कतारची नजर असेल.
 
कतारचा पुढचा सामना आता 25 नोव्हेंबरला सेनेगलशी होणार आहे. त्याच दिवशी इक्वेडोर संघाची लढत नेदरलँडशी होणार आहे.

Edited By - Priya Dixit