ता रा रम पम
तकलादू कथानकाला कार रेसिंगचा मुलामा
निर्माता- आदित्य चोपडादिग्दर्शक- सिद्धार्थ आनंद संगीतकार- विशाल शेखरकलाकार- सैफ अली खान, राणी मुखर्जी, जावेद जाफरी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने यापूर्वी 'सलाम नमस्ते' चित्रपटात '
ता रा रम पम' चे कथानक अविश्वसनीय व चमत्कारिक आहे. रेसिंग कारचे टायर बदलणारा नायक बघता बघता सुप्रसिद्ध रेस ड्रायव्हर बनतो. अवघ्या दोन तीन भेटीत एक सुंदर मुलगी त्याच्या प्रेमात पडते. पुढे लग्न होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना अपघात होतो. अपघातानंतर तो कार रेसमध्ये भाग घेऊ शकत नाही. नायकाला बचत करण्याची सवय नसल्याने सुख सोयींची सर्व साधने हिरावली जातात. आर्थिक तंगीत तो आपले जीवन व्यतीत करतो. मुलाच्या शाळेची फी भरण्याकरिता टॅक्सी चालवितो. लोकांना फसवून पैसे जमविण्यासही तो मागे पुढे पाहत नाही. अशातच मुलगा आजारी पडतो. ऑपरेशनसाठी पैशाची आवश्यकता भासते. सगळीकडून विपरीत परिस्थितीत सापडलेला नायक परत कार रेसमध्ये भाग घेऊन गमावलेले स्थान व पैसा मिळवितो. कार रेसिंग व अमेरिका बाजूला ठेवली तर चित्रपट पन्नास वर्षे जूना वाटतो. तकलादू कथानकात कार रेसिंग घुसडले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनेच कथा लिहीली आहे. त्यामुळे अगोदर कार रेंसिंगचा विचार करून नंतर कथा रचल्याचे स्पष्टपणे जाणवते. या कथानक नक्की असल्यानंतर हबीब फैजल यांना पटकथेचे स्वातंत्र्य ते काय असणार? तरीही त्यांनी लिहिलेले काही प्रसंग छान आहेत. कलाकारांचा कसदार अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. सैफ व राणीची जोडी छान जमली आहे. सैफ अली खानने एक चॅम्पियन व नंतर निराशेच्या गर्तेत सापडलेल्या कार रेसरची भूमिका ताकदीने उभी केली आहे. राणीचा अभिनय सहज, सुंदर व नैसर्गिक आहे. कुटुंबातील मुले अँजेलिना इदनानी व अली हाजी अप्रतिम. जावेद जाफरीनेही ओव्हर अँक्टींग करण्याचे टाळले ही समाधानाची बाब.विशाल शेखरचे संगीत चांगले आहे. बघताना सर्वच गाणी छान वाटतात. विनोद प्रधानचे छायाचित्रणव सलीम सुलेमानचे पार्श्वसंगीत चित्रपटाला साजेसे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सफाईदार आहे. कार रेसिंगच्या दृश्यांवर भरमसाट पैसा खर्च करण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण अमेरिकेतील आहे.