मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By

फ्रेंडशिप डे: मैत्रीवर महान लोकांचे 13 विचार

मैत्री हे नातं सर्वात प्रिय असतं. आम्ही- तुम्हीच नाही तर दुनियेतील महान विचारवंतांनी पण मैत्रीची महानता स्वीकारली असून ते अभिव्यक्त केले आहे. पाहा काही महान लोकांनी कसे परिभाषित केले आहे मैत्रीला...

 
1 मैत्री परिस्थितीचा विचार करत नसते, जर विचार करत असेल तर समजून घ्या मैत्री नाहीये. - मुन्शी प्रेमचंद
 
2 मैत्रीची परीक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मदत बिनशर्त असणे आवश्यक आहे. - महात्मा गांधी 
 
3 जो टिका करतो परंतू मैत्री तुटण्याच्या भीतीने सावध राहतो, तो मित्र नाही. - गौतम बुद्ध
 
4 प्रकृती जनावरांनादेखील आपले मित्र ओळखण्याची समज देते. - कॉर्नील 

5 मित्रांशिवाय जगणे कोणालाही पसंत नसतं, मग त्याच्याकडे सर्व चांगल्या वस्तू का नसो. - अरस्तू
 
6 जो आपल्याला वाईट मार्गावर जाण्यापासून वाचवतो, योग्य मार्ग दाखवतं आणि संकट काळात तुमचा साथ देतो तोच खरा मित्र आहे. - तिरुवल्लुवर 
7 दुनियेतील कोणत्याच गोष्टीचा आनंद तो पर्यंत परिपूर्ण नसतं जोपर्यंत तो आनंद मित्रासोबत घेतला नसेल. - लॅटिन
 
8 शहाणा मित्र जीवनाचा सर्वात मोठा वरदान आहे. - यूरीपिडीज

9 सर्वांशी चांगले वागा पण सर्वोत्तम असलेल्याच मित्र बनवा. - इसोक्रेटस 
 
10 मित्र दुःखात राहत देतो, संकटात मार्ग दर्शन करतो, जीवनाची खुशी, जमिनीतील खजिना आणि मानवी रूपात देवदूत असतो. - जोसेफ हॉल 
 
11 मैत्री दोन घटकांनी बनली आहे, सत्य आणि प्रेम. - एमर्सन 
12 खर्‍या मैत्रीत उत्तम वैद्याप्रमाणे निपुणता आणि कौशल्य असतं, मातेप्रमाणे धैर्य आणि प्रेम असतं. अशी मैत्री करण्याचा प्रयास केला पाहिजे. -रामचंद्र शुक्ल 
 
13 जीवनात मैत्रीहून अधिक सुख कशात नाही. - जॉन्सन