1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
  4. Friendship Day 2023 Have at least one friend

मैत्र, म्हणजे थंडगार पाण्याचा शिडकाव असा

मैत्र, म्हणजे थंडगार पाण्याचा शिडकाव असा,
तजेलदार व्हायला, प्रत्येकाला अगदी वाटे हवासा,
आलेली मरगळ चुटकीसरशी जाते निघून,
मोकळा होतो माणूस त्यानं आपणहून,
नकोत कोणते वैद्य, नकोत कोणतीही मात्रा,
मित्रांच्या गराड्यात विवंचनेवर मिळतो उतारा,
तोडगा मिळतो तात्काळ  प्रत्येक समस्येवर ,
असावं मैत्रबन आजूबाजूला, फिर काहे का डर!! 
उडतात हास्याचे कारंजे अगदी वरचेवर,
थट्टा मस्करी चालत राहते, मजेत दिवसभर,
करू नका संकोच मंडळी, मारा हाक मित्राला,
धावत येईलच बघा तो,काय झालं हे विचारायला!! 
..अश्विनी थत्ते.
पुढील लेख
Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये 1300 हून अधिक पदांसाठी रिक्त जागा