1 हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
2 माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना…
3 आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
4 चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
5 मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
6 लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…
7 मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…
8 जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं...
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.