शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (20:41 IST)

श्री गजानन महाराज समाधी दिवसानिमित्ताने!

घेऊनिया समाधी, ते निघोनी गेले,
परी सकळा तुम्ही आश्वस्त केले,
"मी गेलो असे तुम्ही समजू नका"
माझ्या परी पण निष्ठा तुम्ही राखा!
येते प्रचिती , जर तुम्ही जाल चरणी,
विसरून स्वतःला , कराल जर विनवणी,
कोठेही असा हो, तरी महाराज  साथ देतात,
एकटे असाल तर ते सोबत चालतात,
त्यांच्यात आपणा "परब्रह्म"दिसून येते,
माते परी वात्सल्य त्यांच्यात आपल्यास दिसते,
माझं अवघं जगचं तेच आहे हा माझा विश्वास,
कृपा राहो मजवर, सदा जवळ असावा वास!!
....अश्विनी थत्ते