1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (13:13 IST)

Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी पुन्हा येऊन त्याची संधी द्यावी!!

Ganesh Visarjan
आलात तुम्ही घरी, घराचं देऊळ झालं,
रूप तुमचं बघता, डोळ्याचं पारणं फिटलं,
रोज तुम्ही होतात, बोलायचे तुमच्याशी,
बोलून तुमच्याशी हलके वाटायचे मनाशी,
आता तुम्ही जाणार, आपल्या गावी निघून,
आमचं घर मात्र जाल सुनं सुनं करून,
पण एक मात्र खरं की एक सकारात्मक ऊर्जा देऊन जाल,
दुःखाशी दोन हात कसे करायचे, ते शिकवून द्याल,
मग तर तुमच्या आशीर्वादाने जिंकूच हो लढाई,
एवढं बळ आमच्यात तुमची श्रद्धा च देई,
जे सेवा केली ती गोड मानून घ्यावी,
पुढच्या वर्षी पुन्हा येऊन त्याची संधी द्यावी!!
...अश्विनी थत्ते