Marathi Biodata Maker
✕

गणपतीचे वाराचे अभंग

Updated: बुधवार, 9 सप्टेंबर 2026 (13:45 IST)
सिंदुर चर्चित मस्तक सिंदुर दनुजारी तूं थोर ।
सर्व संकटें वारुनि विघ्नें, स्मरतां करिसी दूर ॥१॥
विद्यारंभीं उत्सवकालीं जातां येतां नाम ।
मंगलधाम स्मरतां तुझें, मोरया पुरविसि काम ॥२॥
पाशांकुशरद वरद करा तूं अससी जगतीं हेतू ।
स्मरतां भक्तां गति देसी तूं तारक अमुचा तो तूं ॥३॥
लड्‌डुक मोदक भक्षणकारक , शक्तिविधारक एक ।
तो तूं विनायक गजास्य तारक भाविक भयहारक ॥४॥
रक्तच्म्दनप्रसूनवसन प्रिय दूर्वांकुर पूज्य ।
साज्या खाद्याच्या नैवेद्या घेउनि सुख दे प्राज्य ॥५॥
 
गणपतीचा बुधवारचा अभंग
गजवदना सुखसदना शंभुनंदना । विघ्न हरुनि निघ्न करुनिं रमविं मम मना ॥ध्रु०॥
कृतयुगिं तूं पंक्तिहस्त सित विनायक । सिंहवदन, विघ्नदहन, भजक पोषक ।
त्रेतायुगिं मयुरसंगिं मयुरपालक ॥चाल॥ देवा, भावा, भावा ।
जाणसि तूं, षट्‌कर तूं । सद्धेतु । स्वर्णशोभना ॥१॥
द्वापारीं गजवदना, आखुवाहना । रक्तवर्ण, शूर्पकर्ण, परम शोभना ॥
पाशांकुशरदवरकर विघ्नभंजना ॥चाल॥ गणपा । पापा । परिहरिसी ।
वर देसी । भय हरिसी । रक्षिसी जना ॥२॥
कलियुगिं तो तूंच साच येथ प्रगटसी ।
हो उनियां द्विभुज अश्वपृष्ठि बैससी । धूम्रवर्ण तूर्ण भक्तकाम पुरविसी ॥चाल॥
दरदा । वरदा । परदा । विघ्‍नहरा । भक्तवरा । तारिं निज जना ॥३॥
 
गणपतीचा गुरुवारचा अभंग
जयजय गजवदन मदनकोटिसुषमधामन् ॥ध्रु०॥
हिमनगजातनय विनय । हिमकरधर सदयहृदय ।
हतसुररिपुनिचय अभय । वरदशय सुधामन् ॥१॥
चित्त करुनि भक्त विमल । चिंतिति तव पादकमल ।
विघ्न हरुनि त्यांसि सकल । काम देसि भूमन्॥२॥
वक्रतुंड चंडकिरण । चक्रभसुर वरदशरण ।
शक्रमुखध्यातचरण । शरणदाधि महिमन् ॥३॥
जे सर्वारंभि आधिं । आठविती तुज तदाधि ।
वारिसि तूं सुरगणाधिपाधिपा महात्मन् ॥४॥
वासुदेव चित्तरमण । भाविकनिजभक्तशरण ।
करुणाकर पूज्यचरण । विघ्‍नहरण भूमन् ॥५॥
 
गणपतीचा शुक्रवारचा अभंग
देवगणाधीश, आद्य मयूरेश । वंद्य जो विघ्नेश ईशपुत्र ॥१॥
स्मरतां विघ्नवना, जाळीं गजानना । गौरीच्या नंदना, मना चिंतीं ॥२॥
स्मरणें जयाच्या, सर्व संकटाच्या । होळी होते त्यांच्या चिंतीं पदा ॥३॥
आपदा हरुनी, संपदा देऊनी । तारि निशिदीनीं, ध्यानी ध्यात्या ॥४॥
त्याचे कृपादृष्टी सुखी हो हे सृष्टी । त्या ध्याऊं संकटीं पुष्टी दे जो ॥५॥
 
गणपतीचा शनिवारचा अभंग
गणराया ये मोरया । सदया ये देववर्या ॥१॥
तुजवीण कोण तारी । विघ्नभीति हे निवारी ॥२॥
विघ्नकर्ता विघ्नहर्ता । तूंचि एक जगद्भर्ता ॥३॥
तव चरण शरण आतां । विघ्नाची नुरवी वार्ता ॥४॥
धरिले म्यां तव चरण । आतां कैचें ये मरण ॥५॥

सर्व पहा

दिवाळीच्या आधी फ्रीज कसा व्यवस्थित लावावा? पदार्थ टिकवण्यासाठी योग्य नियोजन

हनुमानजी आजही जिवंत आहेत का? ते अमर कसे झाले? जाणून घ्या पौराणिक सत्य!

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

अमावस्येच्या रात्री शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे का म्हटले जाते?

दिवाळीत गर्दी टाळून फिरायचे आहे? पर्यटनस्थळ निवडताना या टिप्स वापरा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments