1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (07:30 IST)

Ashtvinayak :ओझरचा श्री विघ्नेश्वर विघ्नाला दूर करणारा पाचवा गणपती

ozar vighnhar ganpati
अष्टविनायक पैकी पाचवा गणपती आहे ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपती हे देऊळ लेण्याद्रीपासून 20 किमीच्या अंतरावर आहे.इथे जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात.विघ्नासुर राक्षसाचा पराभव केल्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात.सर्व विघ्नांना दूर करणारा विघ्नेश्वर गणपती.
 
या देऊळाच्या प्रवेश दारावर चार द्वारपाल आहे. या पैकी पहिल्या आणि चवथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे.गणपती ज्या प्रमाणे आपल्या पाल्यांचे आदर करतात त्याच प्रमाणे आपल्या सर्वांना देखील आपल्या वडिलधाऱ्यांचे आदर केले पाहिजे.
 
इथले देऊळ पूर्वाभिमुख आहे.या देऊळाच्या भिंतींवर रेखीव आणि सुंदर चित्रे आणि शिल्पे आहे.या देऊळाचे कळस आणि शिखर सोनेरी आहे.हे देऊळ 20 फूट लांब असून मुख्य हॉल 10 फुटी लांब आहे.या देऊळात गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. डोळे माणिकचे आहे.गणपतीच्या बाजूस रिद्धी-सिद्धीच्या मुर्त्या आहे.गणपतीच्या मूर्तीच्या वरील भिंतीवर शेषनाग आणि वास्तूपुरुष आहे.इथे भक्तांना ध्यान करण्यासाठी  लहान -लहान ओवऱ्या आहे. 
 
या ओझरच्या गणपतीच्या दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 11 आहे.अंगारकीचतुर्थीला इथे गणेश भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळते.इथे महाप्रसाद देखील मिळतो.
 
इथे गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीला उत्सव साजरे केले जाते.भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून येतात.कार्तिक पौर्णिमेला इथे दीपमाळांची रोषणाई केली जाते.ही रोषणाई बघण्याजोगती असते. श्री क्षेत्र विघ्नेश्वर गणपतीची एक कथा आहे.चला तर मग जाणून घेउ या.
 
प्राचीन काळातील ही कथा आहे.आख्यायिकेनुसार,एकदा अभिनंदन नावाच्या राजा ने इंद्राचे पद मिळविण्याची इच्छा बाळगली आणि त्यासाठी त्याने यज्ञ केला.इंद्राला हे कळतातच ते फार चिडले आणि त्या राजाचा यज्ञ थांबविण्यासाठी विघ्नासुराला त्या ठिकाणी पाठविले.विघ्नासुराने त्या राजाच्या यज्ञ कार्यात फार अडथळे निर्माण केले.पृथ्वीलोकातील सर्व लोकं ब्रह्मदेव आणि शंकराकडे मदत घेण्यासाठी गेले.त्यांनी गणपती तुझी मदत करतील त्यांच्या कडे जा असे सांगितले.
 
 पृथ्वीलोकातील सर्वानी गणेशाचे स्तवन केले.त्यांच्या प्रार्थनेला स्वीकारून त्यांच्यावर प्रसन्न होऊन गणपतीने पाराशर ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि विघ्नासुराशी युद्ध करून त्याचा प्रभाव केला आणि राजाचे सर्व विघ्न दूर केले.त्यावेळी पासून ते विघ्नेश्वर म्हणून प्रख्यात झाले. सर्वानी गणेशाचे वंदन करून त्यांचे आभार मानले.त्यांनी या ठिकाणी गणेशाच्या विघ्नेश्वर स्वरूपाची स्थापना केली.सर्वांचे विघ्न हरणारे असे हे विघ्नेश्वर आहे .
 
जाण्याचा मार्ग :  पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून 85 किलोमीटरवर ओझर हे गाव आहे. त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.
 
 
Edited by - Priya Dixit