कॉंग्रेस बुडते जहाज- अरुण जेटली
कॉंग्रेसची अवस्था एका बुडत्या जहाजासारखी झाली आहे. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेतेच कॉंग्रेसला बुडवण्याचा विचार केला असल्याची खरपूस टीका भारतीय जनात पक्षाचे नेते अरुण जेटली यांनी केली. कॉंग्रेसच्या नेते आगामी लोकसभा निवडणुकीपासून लांब पळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षाचे नेतेच कॉंग्रेसला बुडवणार असल्याचे जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.
जनचाचणीच्या अहवालानुसार कॉंग्रेसचा भाजपकडून पराभव होणार असल्याचे सांगितले जात असताना कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी मात्र हे अहवाल खोटे असल्याचा दावा केला आहे. परंतु जेटली म्हणाले, यावेळीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 2009 पेक्षा जास्त जागा मिळतील असा खोटा आत्मविश्वास राहुल गांधी कॉंग्रेसजनांमध्ये निर्माण करीत आहेत. राहुल गांधी सत्यापासून दूर जाण्याचा केवलवाणा प्रयत्न करत आहेत.

