गांधीजींचे गाव आणि नरेंद्र मोदी
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट दिसून येते. गुजरातमधील कराडी हे गाव देखील याला अपवाद नाही. गुजरातमधील नवसारीला जोडणारा दांडी मार्ग आता राष्ट्रीय राजमार्ग म्हणून ओळखला जातो. अतिशय सुंदर आणि प्रशस्त असलेल या महामार्गापासून एक लहानसा रस्ता कराडी गावापर्यंत पोहोचतो. गाव सुरू होण्यापूर्वीच मोठ-मोठी घरे दिसू लागतात. लांबूनच कराडी गाव एखाद्या विकसित गावाप्रमाणे दिसू लागते. सुंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ-मोठे बंगले उभे असलेले दिसतात. शाळेकडून येणार्या रस्त्यांवर गणवेश घातलेल्या विद्यार्थ्यांचा जत्था येता-जाता दिसतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर एक मोठा तलाव पाहायला मिळतो. या तलावाशेजारी गांधी स्मृती मंदिर आहे. याच ठिकाणी असलेल्या एका आंबच्या झाडाखाली एक झोपडी आहे. दांडी यात्रेत मिठाचा कायदा मोडून परतल्यानंतर महात्मा गांधीजी याच झोडपडीत 20 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिले होते.
गांधीजींनी कराडी गावातच आपले कायमस्वरुपी निवासस्थान बनवले होते. या गावची लोकसंख्या जवळपास 1300 आहे. गावातील 75 टक्के लोक परदेशी रहिवाशी आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका अशा विविध देशांतून आलेले लोक याठिकाणी राहतात. मोठमोठे बंगलेदेखील याच लोकांचे आहेत. अधूनमधून दोन-तीन महिन्यांसाठी ते या गावात येऊन राहतात. गावात 24 तास वीज आहे. इथल्या दुकानांमधून बंद बाटलीतून पाणी विक्री होते. गावातील रस्ते पक्के आहेत. गावात मोठी टाकी असून त्यामधून घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वीज, पाणी आणि रस्ते सरकारच्या निधीतून झाले आहेत. इतर सर्व खर्च गावच्या निधीतून भागवला जातो. या गावातील प्रत्येक घरात पक्की शौचालये बांधलेली आहेत. गांधीजींच्या विचारांवर चालणारी मोठी शाळा या गावात आहे. या शाळेत इंग्रजी आणि गुजराती माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाते. शाळेसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा सर्व पैसा परदेशातील लोकांनी पाठविला आहे. इंग्रज राजवटीपूर्वी या ठिकाणचे लोक यंत्राविना चालणारी नाव बनवत होते.
महात्मा गांधीजी 1893 मध्ये आफ्रिकेला गेले होते परंतु कराडी गावातील काही लोक त्यापूर्वी म्हणजे 1875 मध्येच आफ्रिकेत जाऊन आले होते. 1920च्या दशकात कराडी गावात पहिली राष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल या शाळेचे अध्यक्ष होते. इथले लोक पहिल्यापासूनच व्यापारी प्रवृत्तीचे आहेत. शिक्षणाने त्यांच्यासाठी नवे मार्ग निर्माण केले. त्यामुळे ते जगभर पोहोचले. विदेशातील लोकांच्या पैशावर जेव्हा याठिकाणी पहिली राष्ट्रीय शाळा उभारण्यात आली तेव्हा त्याचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते.
16 व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण भारतात नरेंद्र मोदींविषयी जी सहानुभूती पाहायला मिळते ती कराडी गावातदेखील दिसते. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे येथील लोकांना वाटते. विकासाच्या सर्व योजना या गावात यापूर्वीच पोहोचल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्याचे येथील लोक सांगतात. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक गुजराती नेता ‘7 रेसकोर्स’ च्या शर्यतीत असल्याचे येथील लोकांना अप्रूप वाटते. एक गुजराती माणूस पंतप्रधान होत असेल तर आपल्याला यापेक्षा अधिक काही नको, असे येथील लोक बोलतात. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वात गेल्या ही वर्षापासून खूप मोठा बदल झाला आहे. कदाचित ते महात्मा गांधीजींच्या मानवतावादी विचाराकडे वळतील आणि देशाचे कल्याण करतील असेही येथील लोकांना वाटते. सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मानवतावादी रस्ता हाच सर्वात चांगला मार्ग आहे. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान बनले तर त्यांना याच मार्गाने जावे लागेल.