'टाइम' चाचणीत केजरीवाल आघाडीवर
बहुप्रतिष्ठीत 'टाइम' मासिकाच्या मतचाचणीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि केटी पेरी, जस्टीन बीबर आणि लवेर्ने कॉक्स यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे.
'टाइम' मासिकाने 2104 मधील शंभर सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यासाठी मतचाचणी घेतली. जगातील चांगल्या-वाईट घडामोडींमध्ये सर्वांत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींची यादी तयार केली आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.

