1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. ...तर ते खरे मुस्लिम नाहीत- अबू आझमी

...तर ते खरे मुस्लिम नाहीत- अबू आझमी

'जे मुस्लिम समाजवादी पार्टीच्याविरोधात बोलतात, ते खरे मुस्लिम नसल्याची मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा उधळली आहेत. लखनौमधील गुरुवारी आयोजित एका प्रचार सभेत अबू आझमी बोलत होते. जे पक्षाविरोधात बोलतात त्यांची डीएनए टेस्ट करा, असेही आझमी म्हणाले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुस्लिमांसाठी खूप संघर्ष केला आहे. लोकसभेत समाजवादी पक्षाला मतदान देण्याचे आवाहनही आझमी यांनी केले.

'जो मुस्लिम समाजवादी पक्षाविरोधात बोलतो, तो खरा मुस्लिम नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून अबू आझमींनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.