दिनचर्या नरेंद्र मोदींची
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची दिनर्चा पाहिल्यानंतर त्यांना यंत्रमानव हे विशेषण लावले तर अतिशयोक्ती होणार नाही. 63 वर्षीय नरेंद्र मोदींची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते. सकाळी ते नियमितपणे योगाभ्यास करतात आणि मॉर्निग वॉकलाही जातात. त्यांनंतर वृत्तपत्रांचे वाचन होते. गेली कित्येक वर्षे यात बदल झालेला नाही. भाजपात ‘तेजतर्रार नेता’ अशी ओळख असलेले नरेंद्र मोदी सकाळच्या नाष्टय़ामध्ये दक्षिण भारतीय पदार्थ पसंत करतात. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात त्यांना गुजराती पद्धतीचे भोजन लागते. त्यात रोटी, डाळ, कढी, भात आणि भाजी यांचा समावेश असतो. वेळेची बचत करण्यासाठी ते विमानात प्रवास करत करतच भोजन घेतात.
नरेंद्र मोदी कधीही कोणतेही थंड पेय घेत नाहीत. सतत भाषणे करावी लागत असल्यामुळे घसा व्यवस्थित राहावा याची ते काळजी घेतात. ते नेहमी कोमट पाणी पितात. कधी-कधी घसा तंदुरुस्त राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधेही घेतात. कडक उन्हातही मोदींनी गेल्या एक महिन्यापासून जाहीर सभांमध्ये भाषणे केली आहेत. निवडणूक प्रचाराचवेळी नरेंद्र मोदी स्थानिक मुंद्यावर अधिक भर देतात. यासंदर्भातली माहिती त्यांचे सहकारी एका कागदावर गुजराती भाषेत लिहून देतात. नरेंद्र मोदींनी खास निवडणुकीसाठी आयटी झालेल्या मुलांची टीम तयार केली आहे. या टीममधील सदस्य सर्व माहिती अद्यावत ठेवतात. गरज पडेल तेव्हा ही मोदींपर्यत पोहोचविली जाते. सोशल मीडियावर येणार्या प्रतिक्रिया मोदी स्वत: वाचून त्यांना उत्तरेही देतात.
नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत 3 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. 5 हजार 827 निवडणूक रॅली, कार्यग्रम आणि रोड शो च्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी हरियाणातील रेवाडीमध्ये माजी सैनिकांच्या एका सभेत केलेल्या भाषणाने त्यांच्या अभिानाची सुरुवात झाली असून ती येत्या 10मे पर्यंत चालणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 25 राज्यात 437 जाहीरसभा घेतल्या आहेत. याशिवाय थ्रीडी या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1350 सभेतून लोकांशी संवाद साधला आहे. 1 ते 10 मे दरम्यान ते याच माध्यमातून आणखी 600 सभा घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात त्यांनी 4 हजार ‘चाय पर चर्चा’ हा कार्यक्रम घेतला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोदी यांनी 21 राजत 38 जाहीर सभेतून एक कोटी लोकांशी संपर्क साधला आहे. प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात त्यांनी 196 भारत विजय रॅली काढली आहे. याच टप्प्यात 241 सभांमधून त्यांनी 5 ते 10 कोटी लोकांशी संवाद साधला आहे.
नरेंद्र मोदी यांचा दिवस खूप मोठा असतो. झोपण्यासाठी त्यांना फक्त चार तासाचा अवधी मिळतो. रात्री एक वाजल्यानंतर ते झोपण्यासाठी जातात आणि पहाटे पाच वाजता त्यांची दिनचर्या पुन्हा एकदा सुरू होते.
जयप्रकाश अभंगे