1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. नगरसेविका अपहरण नाट्याला कलाटणी

नगरसेविका अपहरण नाट्याला कलाटणी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहरण नाट्याला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. अर्चना कोठावडे यांचे अपहरण झाल्याच्या चर्चेला उधाण आले असताना त्या खासगी कामानिमित्त बंगळुरूला गेल्याचे उघड झाले आहे. उद्या (29 एप्रिल) स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होत आहे. अर्चना कोठवादे अचानक बेपत्ता झाल्यामुळे यामागे मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अर्चना कोठवादे बेपत्ता असल्याची तक्रार भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी रामनगर पोलिसांत दिली होती. या तक्रारीनंतर   राजकीय वर्तुळात कमालीची खळबळ माजली होती. मात्र, आपले अपहरण झाले नसून खासगी कामासाठी बंगळुरूमध्ये आले असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना मेसेज करून सांगितले आहे. तसेच मंगळवारी होणार्या निवडणुकीत आपण सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही कोठवादे यांनी केला आहे.

या अपहरण नाट्यामुळे आमदार चव्हाण आणि अर्चना कोठवादे यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.